New Admission Open Gcc-Tbc 2021

*कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा कशी होते ?  आणि कोण घेते ?*

कॉम्प्युटर टायपिंग म्हणजे GCC-TBC ची परीक्षा ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे’ ही महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त विभागाव्दारे घेतली जाते.

सदर परीक्षेमध्ये कॉम्प्युटरचे नॉलेज आणि टायपिंगचे स्किल परीक्षणाचे काम केले जाते. एकूण १०० गुणांची परीक्षा असून त्यासाठी ९० मिनिटे इतका निर्धारीत वेळ असतो.

१०० गुणांची विभागणी ही प्रमुख्याने ५० टक्के प्रॅक्टीकल आणि ५० टक्के थेअरी अशा समान विभागात विभागणी केलेली आहे. थेअरी विभागात २५ बहुपर्यायी ऑबजेक्टीव प्रश्न विचारले जातात. त्याला ५० गुण असतात. त्यात विद्यार्थ्यांना किमान २५ गुण मिळणे अपेक्षित आहे.

थेअरी विभागाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना संगणकाबद्दलची विस्तृत माहिती किती आहे हे पडताळणे हा आहे. त्यासाठी शासन मान्य कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट मधून – कॉम्प्युटर फंडामेंटल, कॉम्प्युटरचा पूर्व इतिहास, संगणकाची कार्य पद्धती, संगणकाचे विविध भाग व त्यांची कार्य पद्धती, कॉम्प्युटर हार्डवेअर – सॉफ्टवेअर, त्याचा प्रत्यक्ष वापर त्यातील मेनु, सबमेनु, कमांडस्, शॉर्टकट किज् या सर्व बद्दलची माहिती शिकवली जाते. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना इंटरनेट, भविष्यातील संगणकीय यूग आणि त्यापुढील चॅलेंजेस याही विषयी माहिती दिली जाते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमावरच परीक्षेत ऑबेजेक्टीव प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी किमान ५० टक्के गुण म्हणजेच, ५० पैकी २५ गुण मिळाल्याशिवाय विद्यार्थी या विभागात पास होत नाही.

यानंतर विद्यार्थ्यांना ३० गुणांच्या स्वतंत्र प्रात्याक्षिक विभागाला परीक्षेत सामोरे जावे लागते. त्यात ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट असे तीन प्रश्न असतात आणि या विभागाला एकूण ५८ मिनिटे इतका कालावधी असून ३० पैकी कमीत कमी १५ गुण मिळाल्यावरच विद्यार्थी या विभागत पास होतो.

इंटरनेट विषयीचा प्रॅक्टीकल प्रश्न म्हणजे ईमेल होय! कुठल्याही कार्यालयात गेल्यावर कर्मचाऱ्यांना ईमेल हाताळता आला पाहिजे म्हणून परीक्षा परिषदेने प्रात्याक्षिक विभागातील पहिलाच प्रश्न - ईमेलचा प्रश्न विचारलेला आहे. त्याला एकूण ५ गुण आणि ८ मिनिटे वेळ असतो. त्यांनतर लगेचच लेटर टायपिंग आणि त्याचे फॉरमेटींगच्या प्रॅक्टीकल प्रश्नाला विद्यार्थ्यांना सामारे जावे लागते. यात एमएस-वर्ड मध्ये संपूर्ण लेटर टाईप करुन क्लासमध्ये शिकविल्या प्रमाणे विद्यार्थ्यांने फॉरमेटींग करणे अपेक्षित असते. यासाठी १५ गुण आणि ३० मिनिटे कालावधी असतो. त्यानंतर लगेच एक्सेलमध्ये विहित नमुन्यातील स्टेटमेंट विद्यार्थ्यांनी टाईपकरुन आकर्षक पद्धतीने मांडणी करणे याकरीता १० गुणांचा आणि २० मिनिटांचा या विभागातील शेवटचा प्रश्न असतो.

सदरच्या दुसऱ्या विभागासाठी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये - इंटरनेट, एमएस-ऑफिस प्रॅक्टीकली शिकविणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना टंकलेखनाचे कौशल्य वापरुन संगणाकावर प्रत्यक्षात कार्यालयीन कामकाज करण्याचे धडे इन्स्टिट्यूट मध्येच दिले जातात. त्यामुळेच येथे एक-एक कुशल कार्यालयीन कर्मचारी तयार होतो.

परीक्षेच्या शेवटच्या म्हणजे तीसऱ्या विभागात ७ मिनीटाच्या स्पीड पॅसेजला विद्यार्थ्यां सामोरे जायचे असते. यात विद्यार्थ्यांने ७ मिनिटांत २० गुणांचा स्पीड पॅसेज अचूक आणि वेगात टाईप करणे अपेक्षित असते. २० पैकी १० गुण मिळाल्यानंतरच विद्यार्थी या विभागात पास होतात.

विद्यार्थ्यांना परीक्षेतील तीनही विभागात किमान ५० टक्के गुणाने पास होणे आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थी या परीक्षेत पास होत नाही.

परीक्षेतील शेवटचा विभाग हा टंकलेखनाचा वेग आणि अचूकता तपासण्याचे कार्य करते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कॉम्प्युटर टायपिंगच्या एकूण ७ परीक्षा घेतल्या जातात.

१.मराठी ३० शब्द प्रति मिनिट
२.मराठी ४० शब्द प्रति मिनिट
३.हिंदी ३० शब्द प्रति मिनिट
४.हिंदी ४० शब्द प्रति मिनिट
५.इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट
६.इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट आणि
७.स्पेशल स्किल फॉर कॉम्प्युटर टिचर

अशा ७ परीक्षाच्या माध्यमातून विद्यार्थी, कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट मधून परिपूर्ण संगणकीय ज्ञान आणि टंकलेखनाचे कौशल्य प्राप्त करु शकतात. असे संगणकीय ज्ञान आणि टायपिंगचे कौशल्य असलेला दुहेरी अभ्यासक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एकमेव अभ्यासक्रम आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

माऊली  कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट,*
त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स बुलढाणा अर्बन बँक समोर बाजार सावंगी
मोबाईल नंबर 9923948681
What aap No 9420298681

mauli Computer



एक टिप्पणी भेजें

2 टिप्पणियाँ