संगणकाचा विकास

संगणकाचा विकास 

  • प्रथम पिढी (First Generation) 1940 ते 1956

  • यामध्ये व्हॅक्यूम्य ट्यूब म्हणजेच काचेच्या नळ्या वापरलेल्या होत्या, या नळ्यांद्वारे संदेश नियंत्रित केले जात असत.त्या काळातील हे सर्वात गतिमान यंत्र होते व यात आकडेमोड करण्यासाठी एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागत असे. EDVAC-45 मद्धे डेटा व प्रोग्राम साठवून ठेवता येत तसेच यात प्रोसेसिंग युनिट होते. जॉन व्हॉन न्युमन याने हा संगणक विकसित केला. मात्र या सर्व संगणकाचे बरेचसे तोटे होते.
व्हॅक्यूम्य ट्यूब शोध 1904 मध्ये लागला

  • दुसरी पिढी (Second Generation) 1956 ते 1963

  • १९४७ च्या सुमारास विलियम शॉकले यांनी ट्रान्झिस्टरचा शोध लावला व त्यानंतरच्या दहा वर्षात त्यांचा उपयोग संगणकामध्ये केला जाऊ लागला. या पिढीतील संगणक खूप माहिती साठवून ठेवू शकत तसेच यात प्रिंटर, टेप, मेमरी, स्टोरेज या सर्वांचा समावेश होता. सुरुवातीला फक्त अणुशक्ती केंद्रात (Automic Research) मध्ये वापरले जाणारे हे संगणक हळूहळू मोठमोठ्या कंपन्या, व्यवसाय, विद्यापीठ व सरकारी कामकाजात वापरले जाऊ लागले.



  • तिसरी पिढी (Third Generation) 1964 ते 1971 

  • १९५४ नंतर इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रात इंटिग्रेटेड सर्किटस्चा (ICs)चा शोध लागला.म्हणजे सिलिकॉनपासून बनलेल्या छोट्या चिप्स. या चिप्स संगणकात वापरल्या जाऊ लागल्या. यामध्ये अनेक सर्किटस् एका छोट्या चिपवर बसवल्या जातात. या संगणकात सूचनांचा एक मोठा संच साठवलेला होता व या वेगवेगळया सूचनांच्या साहाय्याने हे संगणक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकत. तसेच यामध्ये एकच मुख्य प्रोग्राम इतर प्रोग्राम्सचे नियंत्रण करीत असे. यातूनच Operating Systemची कल्पना पुढे .आली


  • चौथी पिढी (Fourth Generation) 1971 ते आजपर्यंत 

  •  १९७५ नंतर या पिढीतील संगणकातल्या चिपवर केवळ १० ते २० छोटे भाग मावत. मात्र चौथ्या पिढीतील संगणकात अधिक विकसित चिप्स वापरल्या गेल्या. यात एका छोट्या चिपवर अगणित भाग मावतात. यामुळे संगणकाचा आकार साहजिकच लहान झाला. अतिशय स्वस्त असल्याने याचा जगभर वेगाने प्रसार झाला. आज जगात वापरले जाणारे सर्व संगणक चौथ्या पिढीतील आहेत. यात आकार, काळ व क्षमतेनुसार या पिढीतील अनेक वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ