(कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क बेसिक)

 (कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क बेसिक)

1) नोड - Node:


नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणतात. हे नोड एखादा कॉप्यूटर, लॅपटॉप, प्रिंटर किंवा कोणताही इनपुट अथवा आऊटपुट उपकरण असू शकते.

2) होस्ट -Host :

  • नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक कॉम्प्युटर किंवा इतर उपकरण असते.
  • नेटवर्क होस्ट नेटवर्क मधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोडसना रिसोर्सेस, सर्विसेस आणि ॲप्लीकेशन पुरवितात.

3) नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC) :
Network Interface Card (NIC)

नेटवर्क इंटरफेस कार्ड कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल केलेले एक सर्किट बोर्ड किंवा कार्ड असते.


4) नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम Network operating system (NOS) :

ही ऑपरेटिंग सिस्टीम नेटवर्क मधील सर्व कॉम्प्युटर्सचे कार्य सांभाळते.
याची रचना सर्व्हरवर चालविण्यासाठी बनवली गेली आहे आणि सर्व्हरला डेटा मॅनेज करणे, युझर, ग्रुप, सेक्युरिटी, ॲप्लीकेशन आणि इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.

  5) लोकल एरिया नेटवर्क LAN (Local Area Network):

LAN (Local Area Network

लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे कॉम्प्युटर नेटवर्क मीडिया वापरून, घर, शाळा, संगणक प्रयोगशाळा, किंवा एक इमारतीतील कार्यालय अश्या मर्यादित परिसरातील कॉम्प्युटरला इंटरकनेक्ट करते.


6) वाइड एरिया नेटवर्क (वॅन)- WAN (Wide Area Network) :

WAN (Wide Area Network)

वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्टीत केलेले असते जसे महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क जे भाड्याच्या दूरसंचार लाइन्सचा वापर करतात.

7) प्रोटोकॉल -Protocol :
प्रोटोकॉल हा नेटवर्क मधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील त्याचे नियम व मानदंड यांचा संच आहे.


8) इंटरनेट प्रोटोकॉल- IP (Internet Protocol):

इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल सुट मधील एक प्रमुख प्रोटोकॉल आहे जो नेटवर्कच्या सीमा ओलांडून डाटा रिले करण्यासाठी वापरला जातो. याचे राऊटींग फंक्शन इंटरनेटवर्किंगला सक्षम करते आणि इंटरनेटची स्थापना करते.


 9) ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल- TCP (Transmission Control Protocol):


  • ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हो नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे, जो इंटरनेटवर डाटा पॅकेट पाठवतो.
  • टिसीपी हा ओएसआय लेअर मधील ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल आहे.

10) फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल - FTP (File Transfer Protocol) :

फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल (FTP) हा स्टॅंडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे जो कॉम्प्युटरमधील फाइल टिसीपी बेस्ड नेटवर्क जसे इंटरनेटमध्ये एका होस्ट कडून दुस-या होस्ट कडे  पाठवतो.

11) डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System) :


डोमेन नेम सिस्टीम ही इंटरनेटला किंवा खाजगी नेटवर्कला जोडलेल्या कॉम्प्युटर, सर्विस किंवा इतर संसाधनासाठी वापरली जाणारी वितरीत नामांकन सिस्टीम आहे.

डीएनएस ही इंटरनेट डोमेन आणि होस्टनेमला त्यांच्या आयपी मध्ये अनुवादित करते.

डीएनएस आपोआप वेब ब्राउझर मध्ये टाइप केलेल्या नावाला या साइट होस्ट करत असलेला वेब सर्व्हरच्या आयपी ॲड्रेस मध्ये रुपांतरीत करतात.



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ