संगणकाचा इतिहास – History Of Computer

 संगणकाचा इतिहास – History Of Computer


19 व्या शतकात ‘चार्ल्स बॅबेज’ या गणिताच्या प्राध्यापकाने संगणकाचा शोध लावला. त्याने विश्लेषणात्मक इंजिन तयार केले आहे, त्या आधारावर आजचे संगणक देखील कार्यरत आहेत. आजच्या संगणकांमध्ये देखील ते Analytical Engine वापरलं जात. सामान्यत: संगणकाचे तीन पिढ्यांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. प्रत्येक पिढी ठराविक काळासाठी टिकली आणि पिढ्यांसह आपले संगणक वाढत राहिले म्हणजेच काळानुसार संगणकांमध्ये देखील बदल घडू लागले आणि तुम्हाला आणखी चांगले नवीन फीचर्स सह संगणक मिळू लागले. त्या प्रत्येक पिढी विषयी सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिली आहे ज्यावरून तुम्ही संगणकाचा संपूर्ण इतिहास समजू शकता.


संगणकाची पहिली पिढी ( First Generation Of Computer)



आधारीत – *Vaccum Tubes*

वर्ष – १९४०-१९५६


या पिढीच्या संगणकांद्वारे इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रित आणि प्रसारित करण्यासाठी व्हॅकम ट्यूबचा वापर केला गेला. आपण कल्पना देखील करू शकत नाही कि संगणक बनवताना या गोष्टींचा वापर केला असेल चुकीं ने सगळ्यात आधी संगणकाचे स्वप्न साकार केले म्हणून त्या वेळेस खूप साऱ्या संगणकाचं निर्माण करण्यात आलं या पिढीमध्ये संगणकामध्ये जी Vaccum Tube वापरली जायची तिचा आकार हा खूप मोठा असायचा त्यामुळे त्या Vaccum Tube ला जागा खूप लागायची म्हणून त्या काळातले संगणक हे एवढे मोठे असायचे. त्या काळाचे संगणक तर मोठे होतेच परंतु या सह ते संगणक खूप उष्णता देखील निर्माण करत होते त्या मध्ये Vaccum Tube चा वापर केला असल्यामुळे तुटायची शक्यता खूप जास्त असायची त्याचसोबत याची काम करण्याची क्षमता देखील खूप कमी होती.


या पिढी मध्ये बनवलेले संगणक म्हणजे Electronic Numerical Integrator And Computer (ENIAC), EDSAC (Electronic Delay Storage Automatic Computer), UNIVAC (Universal Automatic Computer) इत्यादी आहेत.


संगणकाची दुसरी पिढी ( Second Generation Of Computer)



वर्ष – १९५६-१९६३


मित्रांनो संगणकाच्या दुसर्‍या पिढीमध्ये *ट्रान्झिस्टरचा* शोध लागला होता हा शोध त्या काळी खूप महत्वाचा आहे आणि आता तो संगणकांमध्ये वापरला जाऊ लागला. हे ट्रान्झिस्टर Vaccum Tube पेक्षा अधिक कार्यक्षम होते आणि त्यांचे आकार देखील त्यांच्यापेक्षा खूपच लहान होते. त्या काळात जेव्हा ट्रान्झिस्टर चा वापर संगणकामध्ये करण्यात आला तेव्हा संगणकाचा आकार हा खूप लहान झाला आणि त्याची फुटण्याची तक्रार देखील नाहीशी झाली ट्रान्झिस्टर हा Vaccum Tube पेक्षा अधिक जास्त उपयुक्त होता त्याची क्षमता अधिक होती आणि आता संगणकाने वेगवान काम करणे सुरु केले. ट्रान्झिस्टर चा वापर केल्यामुळे संगणकाचा काम करण्याचा वेग हा खूप वाढला. आता संगणक पहिल्या पिढ्यापेक्षा लहान होऊ लागले आणि वेगवान काम करू लागले.


संगणकाची तिसरी पिढी ( Third Generation Of Computer)



आधारीत – 


*Integrated Circuit*

वर्ष – १९६३-१९७१


पहिल्या आणि दुसऱ्या पिढीपेक्षा हे संगणक अतिशय लाभदायक होते ट्रान्झिस्टरपेक्षा खूपच लहान असलेल्या या पिढीच्या संगणकामध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स वापरणे सुरू झाले. हे ट्रान्झिस्टरपेक्षा हि खूपच लहान होते आणि याची काम करण्याची क्षमता देखील खूप जलद होती या पिढीच्या संगणकांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि आता बर्‍याच संगणक एकाच वेळी वापरता येतील अशी सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली होती. यामध्ये, सिलिकॉन चिपने बनविलेले एक छोटे इंटिग्रेटेड सर्किट वापरले गेले होते, त्यामुळे त्याचा आकार आता खूपच लहान झाला होता. हे असं संगणक होत जे सामान्य लोक देखील वापरू लागले म्हणजेच या संगणकाचा वापर घरात देखील सुरु झाला.


संगणकाची चौथी पिढी ( Fourth Generation Of Computer)




आधारीत – *Microprocessor*

वर्ष – १९७१- आता पर्यंत


आजच्या काळात आपण जास्त प्रमाणात याच पिढीच्या संगणकाचा वापर करतो तुम्हा सर्वांना लॅपटॉप तर माहितीच असेल लॅपटॉपच निर्माण देखील याच पिढीत करण्यात आलं आहे लॅपटॉप का आपण कुठे पण जाताना सोबत नेऊ शकतो. या पिढीमध्ये बनवण्यात आलेल्या संगणकाचा आकार हा मागील दोन्ही पिढ्यांपेक्षा खूप छोटा आहे ज्याला आपण आपल्या सोबत कुठे पण घेऊन जाऊ शकतो. या प्रकारच्या संगणकात व्हीएसएलआयच्या (VSLI मदतीने हजारो ट्रान्झिस्टर एकत्र जोडले जाऊ शकतात आणि त्याची गती मोठ्या प्रमाणात वाढविली जाऊ शकते. आता आपण सर्वजण या पिढीचे संगणकही वैयक्तिक संगणक म्हणून वापरू लागलो आहोत. ही पिढी संगणक क्षेत्रातली सर्वात मोठी क्रांती मानली जाते.


Admission Open 

Mauli Computer Typing Institute Bazar Sawangi

Contact 9923948681, 9420298681

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ