कॉम्पुटर टायपिंग आणि साधारण टाइपिंगमध्ये काय फरक आहे, कोणत्या टाइपिंगचा जास्त जागा निघतात


कॉम्प्युटर टायपिंग कोर्स केल्याचा फायदा काय ?


खरे तर कॉम्प्युटर टायपिंग तथा GCC-TBC हा कोर्स केवळ सरकारी नोकरीसाठी आवश्यक आहे, असा बरेच जणांचा समज आहे.

मात्र कॉम्प्युटर आणि टायपिंगचे ज्ञान, कौशल्य याचा फायदा काय आहे, हे अनेक जणांना माहित नसल्याने आज आपण येथे या कोर्स केल्याच्या फायद्याविषयी चर्चा करणार आहोत.

आज बाजारात इंटरनेट, कॉम्प्युटर आणि टायपिंगचे ज्ञान तथा कौशल्य असलेले अनेक व्यवसायिक या कौशल्याच्या जोरावर आपले पोट भरताना आपण पाहात आहोत.

त्याच बरोबर हा कोर्स केलेली विद्यार्थी सरकारी नोकरीत क्लर्क–टायपिंस्ट या पदावरती नोकरी करताना ही दिसतात. अधिकारी वर्गातही मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर टायपिंग कौशल्य प्राप्त अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना त्याचे ‘काम अधिक सोपे, वयक्तिक आणि गोपनीय पद्धतीने करण्यास मदत होते’, असे अधिकारी वर्गाचे मत आहे. शिवाय स्पर्धा परीक्षा मध्येही अनेक पदासाठी कॉम्प्युटर टायपिंग कम्पलसरी आहे. बँका, पतसंस्था, कचेरी, ट्रेझरी, पोस्ट ऑफिस, टेलिफोन ऑफिस पासून मंत्रालयातील कार्यालयापर्यंत सर्वच क्षेत्रात आज कॉम्प्युटर टायपिंग क्लासचा विद्यार्थी झळकताना दिसत आहे.

शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर यांनाही आपल्या क्षेत्रात कॉम्प्युटर टायपिंग कौशाल्याचा मोठा उपयोग होतो. कॉम्प्युटर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॅम्युनिकेशन, इत्यादी विविध क्षेत्रातील विद्यार्थी, व्यवसायिकांना या ज्ञानाचा विशेष फायदा होतो. कॉम्प्यटर प्रोग्रामिंगच्या कामात वेग आणि अचुकतेला अन्यन साधारण महत्व आहे.

इंग्लड, अमेरीका सारख्या प्रगत राष्ट्रात मनुष्यबळाचा अभाव असल्याने ट्रान्सक्रिप्शन सारखे नव्यानेच उभा राहिलेले व्यवसाय आज जगभर पसरत आहे. भारतातही मेडीकल ट्रान्सक्रिप्शन, लिगल ट्रान्सक्रिप्शनची सेवा देणारे मोठे जाळे तयार झाले आहे. तिथे वेग आणि अचुक कामाला जास्त प्राधन्य असल्याने कॉम्प्युटर टायपिंगचा विद्यार्थी या क्षेत्रातही सरस ठरत आहे.

या डिजिटल युगात गृहिणी, महिला, मुलींना कॉम्प्युटर टायपिंगचा विशेष फायदा होतो. महिलांना मुलांचा अभ्यास घेण्यासाठी, स्मार्टफोन व्दारे घरगुती कामे ऑन-लाईन करण्यासाठी, स्मार्ट कम्युनिकेशनसाठी ही या अभ्यासक्रमाचा उपयोग होतो.

डिजीटल करन्सी, ऑन लाईन बँकीग, जीएसटी या सर्वांचा विचार करता व्यापारी, व्यावसायिक यांनाही आजकाल संगणकीय कौशल्य, वेग आणि अचुक कामाची आवश्यकता भासत आहे.

न्यूज पेपर, इलेक्ट्रॉनिक मेडिया, डिजीटल मेडिया, वेब होस्टींग-डिजानिंग, डेटा कलेक्शन, डेटा हॅण्डलींग आणि मॅजमेंट क्षेत्र, मार्केट-पॉलिटीकल सर्व्हेअर्स, ग्राफिक्स डिजानिंग ॲण्ड ॲडव्हजाजिंग एजन्सीज, सोशिअल मिडिया मॅजमेंट ॲण्ड प्रमोटर्स, कार्पोरेट बॅक ऑफिसेस, इत्यादी इत्यादी क्षेत्रात स्पीड आणि ॲक्युरेशीची नितांत गरज असते. तेथे एक-एक मिनिटाला बदल घडत असतो आणि तो ॲक्युरेट टिपता आला पाहिजे, मांडता आला पाहिजे आणि तो जगा पर्यंत पोहचताही आला पाहिजे म्हणून तेथे कॉम्प्युटर टायपिस्ट मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत वेगाने अचुक काम करु शकतो. त्याच्या कौशल्याचा येथे खूप मोठा फायदा होतो.

अशी अनेक क्षेत्र आहेत की जी सरकारी नोकरी पेक्षाही सरस जॉब देऊ शकतात. त्यासाठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंटरनेट विषयी परफेक्ट ज्ञानाची आवश्यकता असते.

एकूणच शिक्षण, व्यापार, व्यवसाय, बँकींग, कम्युनिकेशन, शासकीय, निमशासकीय कार्यालये, कारखाने, कार्पोरेट क्षेत्र, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यालये, एनजीओ, मोठमोठे हॉस्पिटल, अशा नानाविध क्षेत्रात कॉम्प्युटर टायपिंग म्हणजे GCC-TBC चा विद्यार्थी चमकू शकतो. फक्त सर्वसामान्य बुद्धमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी GCC-TBC हा कोर्स नसून अफाट, अचाट बुद्धेमत्तेच्या विद्यार्थ्यांनांही हा कोर्स यशाच्या उंच शिखरावर पोहचू शकतो यात तिळमात्रही शंका नाही.

सामान्य टायपिंग ही तुमची स्किल डेवलोपमेंट साठी आहे ... आणि प्रायवेट जॉब साठी ही टायपिंग ठीक आहे... पण शासकीय प्रमाणित केलेले टायपिंग कोर्स हे सरकारी नोकरी साठी महत्त्वाचे आहे..

लिपिक पदांसाठी टायपिंग च्या रिक्त जागा निघतात...



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ