सायबर सुरक्षा म्हणजे काय? |

 आज आपण पूर्वीपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अवलंबून आहोत.आजकाल बेकायदेशीर हॅकिंगच्या वाढत्या प्रमाणामुळे तसेच ऑनलाईन फ्रोड मुळे आपला डेटा लोकांपासून सुरक्षित करण्याची गरज वाढली आहे.

सायबर क्राईम समस्या अख्ख्या जगात आहे.यामुळे वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.तसेच मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँका आणि संस्था यांनासुद्धा याचा धोका आहे.त्यामुळे सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे.



सायबर सुरक्षा म्हणजे काय? | 


सायबर सुरक्षा म्हणजे संगणक, सर्व्हर, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली, नेटवर्क यांचा डिजिटल हल्ल्यांपासून बचाव करणे.संगणक, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली,सर्व्हर नेटवर्क आणि डेटा यासारख्या इंटरनेट शी जोडलेल्या सिस्टम्सचे डिजिटल हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे तंत्र म्हणजे सायबर सुरक्षा(Cyber Security in Marathi) होय.


सायबर आणि सुरक्षा या दोन शब्दांपासून सायबर सुरक्षा शब्द बनला आहे.सायबर म्हणजे ज्यामध्ये सिस्टम, नेटवर्क, डेटा समाविष्ट आहे असे तंत्रज्ञान.आणि सुरक्षा म्हणजे सिस्टिम,नेटवर्क यांच्या माहितीचे संरक्षण.सायबर सुरक्षा याला कॉम्प्युटर सुरक्षा किंवा माहिती तंत्रज्ञान सुरक्षा असेही म्हटले जाते.

चांगले सायबरसुरक्षा धोरण,आपल्या सिस्टम्स मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि संवेदनशील डेटा मिळवण्यासाठी किंवा तो नष्ट करण्यासाठी केलेल्या वाईट हल्ल्यांविरूद्ध चांगली सुरक्ष प्रदान करू शकते.

सायबर सुरक्षा का महत्वाची आहे?

आज आपण डिजिटल युगात आहोत असे म्हटले जाते.आपण पूर्वीपेक्षा जास्त तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत.त्यामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व देखील वाढत आहे.आपल्या जीवनातील भरपूर गोष्टी या मोबाईल, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर यांवर अवलंबून आहेत.विविध बँका, आरोग्य सेवा, वित्तीय संस्था,कंपन्या या इंटरनेटशी कनेक्ट असलेली उपकरणे वापरतात. त्यांची काही गोपनीय माहिती, आर्थिक डेटा आणि वैयक्तिक डेटा, संवेदनशील असू शकतात.जी माहिती बाहेर पडल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते.


त्यामुळे चांगली सायबर सुरक्षा असणे महत्त्वाचे आहे.आपल्या गोपनीय माहितीचे संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे.


सायबर सुरक्षेचे प्रकार | Types of Cyber Security 


ऍप्लिकेशन सुरक्षा | Application Security Information

ऍप्लिकेशन सुरक्षेमध्ये सॉफ्टवेअर आणि अन्य ऍप्लिकेशन यांना धोक्यापासून मुक्त ठेवले जाते.यामध्ये विविध प्रकारच्या धोक्यांपासून वाचण्यासाठी सॉफ्टवेअर आणि सेवांमध्ये विविध संरक्षणाची अंमलबजावणी केली जाते.यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांची गरज लागते.ऍप्लिकेशन मधील त्रुटींमुळे गोपनीय माहिती लीक होऊ शकते.त्यामुळे व्यवस्थित कोडिंग करणे,ऍप डिझाईन करणे आवश्यक असते जेणेकरून सायबर हल्यांपासून वाचता येईल.

नेटवर्क सुरक्षा | Network Security Information 

नेटवर्क सुरक्षा यामध्ये घुसखोर, मालवेअर अनधिकृत प्रवेश यांपासून संगणक नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय केले जातात.नेटवर्क सुरक्षा एखाद्या संस्थेला तिच्या मालमत्तेचे बाहेरील आणि अंतर्गत धोक्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

क्लाऊड सुरक्षा | Cloud Security Information 

क्लाउड सुरक्षा मध्ये संस्थेसाठी डिजिटल पद्धतीने किंवा क्लाउड आर्किटेक्चरमध्ये संग्रहित माहितीचे संरक्षण करणे समाविष्ट असते. धोक्यांपासून सुरक्षितता मिळवण्यासाठी AWS, Google,Azure इत्यादी सारख्या विविध क्लाउड सेवा प्रदात्यांचा वापर केला जातो.

ओळख व्यवस्थापन व डेटा सुरक्षा | Data Security Information

यामध्ये विविध प्रक्रिया समाविष्ट असतात ज्या संस्थेच्या माहिती प्रणालींना कायदेशीर व्यक्तींचे अधिकृतता आणि प्रमाणीकरण देतात.यामध्ये डेटाची अखंडता आणि गोपनीयता राखण्यासाठी चांगली डेटा स्टोरेज यंत्रणा लागू करणे समाविष्ट असते.

मोबाईल सुरक्षा | Mobile Security Information

यामध्ये मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब्लेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसारख्या मोबाइल डिव्हाइसवर संग्रहित संस्थात्मक आणि वैयक्तिक डेटा विविध धोक्यांपासून सुरक्षित करणे समाविष्ट असते.अनधिकृत प्रवेश,व्हायरस, मालवेअर यांपासून सुरक्षेसाठी वापर केला जातो.

माहिती सुरक्षा | Information Security 

माहिती सुरक्षा यामध्ये संवेदनशील डेटा किंवा माहिती चा सायबर हल्लेखोरां पासून बचाव केला जातो.गोपनीयता,अखंडता,उपलब्धता ही तीन उद्दिष्टे माहिती सुरक्षेची आहेत.

मालवेअर | Malware Information 

मालवेअर हे एक सॉफ्टवेअर आहे जे एखाद्या सिस्टममध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या प्रकारच्या मालिशिअस सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस, वर्म्स, रॅन्समवेअर आणि स्पायवेअर यांचा समावेश असतो.लिंक वर क्लिक केल्याने सॉफ्टवेअर इंस्टॉल होते ज्यातून मालवेअर आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये येते.


रॅन्समवेअर | Ransomeware Information 

रॅन्समवेअर हे असे सॉफ्टवेअर असते जे पैसे उकळण्याचे साधन म्हणून तयार केले गेले आहे.जोपर्यंत पीडित व्यक्ती खंडणीची मागणी पूर्ण केली जात नाही तोपर्यंत हल्लेखोर फाईल्स किंवा सिस्टममधील प्रवेश बंद करतात. खंडणी दिल्यानंतरही फाईल रेकव्हरी व सिस्टम पहिल्यासारखी करण्याची ग्यारंटी नसते.


फिशिंग | Phishing Information 

यामध्ये हल्लेखोर आपण एका मोठ्या संस्थेकडून असल्याचा किंवा आपला जुना मित्र असल्याचा बनाव करून ईमेल, फोन किंवा मेसेज पाठवतात. ईमेल किंवा मेसेजमध्ये लिंक पाठवली जात त्या लिंक वर क्लिक केल्यावर केडिट कार्ड,पासवर्ड, यूजर नेम, वैयक्तिक माहिती मिळवली जाते.फिशिंग हा सायबर हल्ल्यांचा सर्वात सामान्य प्रकार आहे.लोकांना या बद्दल माहिती दिल्यास यांपासून बचाव केला जाऊ शकतो.


एसक्यूएल इंजेक्शन | SQL Injection Information 

SQL इंजेक्शनमध्ये SQL वापरणार्‍या सर्व्हरमध्ये धोकादायक कोड घालणे समाविष्ट केला जातो.त्यामुळे क्वेरींमध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी देते.SQL इंजेक्शन मुळे सर्व्हर मधील गोपनीय माहिती लीक होते.SQL इंजेक्शन हल्ला यशस्वी झाल्यानंतर, हल्लेखोर SQL डेटाबेसमध्ये असलेला संवेदनशील डेटा, वापरकर्ता सूची किंवा अन्य माहिती, बदलू शकतो किंवा डिलीट करू शकतो.


डोमेन नेम सिस्टम (DNS) हल्ला | DNS Attack Information 

DNS हल्ला हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये हल्लेखोर डोमेन नेम सिस्टममधील त्रुटींचा फायदा घेतात. हल्लेखोर हे साइट वापरकर्त्यांना दोषपूर्ण वेबसाइटवर पुनर्निर्देशित(Redirect) करतात.आणि प्रभावित संगणकांमधून डेटा चोरतात.ही एक गंभीर सायबरसुरक्षा जोखीम मानली जाते. कारण DNS प्रणाली इंटरनेट पायाभूत सुविधांचा आवश्यक घटक असतो.


मॅन-इन-द-मिडल हल्ला | Man-in-the-Middle Attack Information 

मॅन-इन-द-मिडल हल्यामध्ये सायबर हल्लेखोर डेटा चोरण्यासाठी दोन व्यक्तींमधील संप्रेषण रोखतो. बहुदा असुरक्षित वायफाय नेटवर्क या हल्यांचा बळी पडतो.


सोशल इंजिनिअरिंग | Social Engineering Information 

सोशल इंजिनिअरिंग मध्ये हल्लेखोर हे वापरकर्त्याकडून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी, सुरक्षिततेच्या प्रक्रियेचा भंग करण्यास भाग पाडतात.मानवी संवाद साधून हल्लेखोर गोपनीय माहिती मिळवतात.

डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस(DDoS) अटॅक | Denial-of-service Attack Information 

डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DDoS) अटॅक असे असतात ज्यात एका पेक्षा अधिक सिस्टीम मिळून टार्गे टेड सिस्टीम च्या ट्रॅफिक मध्ये व्यत्यय आणतात. सिस्टीम जसे की एखाद्या वेबसाईट चा सर्व्हर याच्या ट्रॅफिक मध्ये व्यत्यय आणला जातो. मेसेज, कनेक्शन विनंत्या किंवा पॅकेट्सने सिस्टीम ला लक्ष्य करून, आक्रमणकर्ते सिस्टीम धीमा करू शकतात.तसेच क्रॅश करू शकतात.


सायबर सुरक्षेचे फायदे | Benefits of Cyber Security 

सायबर सिक्युरिटीची अंमलबजावणी करण्याचे खालील फायदे आहेत:


व्यवसायांसाठी सायबर हल्ले आणि डेटा यांचे संरक्षण.

डेटा आणि नेटवर्क सुरक्षा दोन्ही सुरक्षित राहतात.

अनधिकृत किंवा अनोळखी वापरकर्ता याचा प्रवेश टाळला जातो.

एंड-यूजर आणि एंडपॉइंट डिव्हाइस संरक्षण

भागीदार, ग्राहक, आणि कर्मचारी यांचा कंपनीच्या प्रति विश्वास राहतो.

सायबर सुरक्षा टिप्स | Cyber Security Tips 

सायबर सुरक्षा जागरूकता निर्माण करा आणि प्रशिक्षण आणि आयोजित करा.

सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम वेळोवेळी अपडेट करा.

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा.

डेटा बॅकअप करा.

सार्वजनिक ठिकाणचा किंवा कुठलाही असुरक्षित वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळा.

अज्ञात व्यक्ती किंवा संस्थेचे ईमेल उघडू नका.

कठीण पासवर्ड चा वापर करा.

नियमित सुरक्षेबाबत माहिती ठेवा.


सायबर सुरक्षा तज्ञ म्हणजे काय? | Cyber Security Expert 

डेटाचे उल्लंघन, हॅकिंग आणि सायबर गुन्हे नवीन यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.अनेक लोक,संस्था या सायबर हल्ल्यांना बळी पडत आहेत. कंपन्या संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि त्यापासून संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ञांवर अधिकाधिक अवलंबून आहेत.


सायबर सुरक्षा तज्ञ संगणक प्रणाली आणि नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात.


यात पुढील काही पद्धतींचा समावेश आहे:


सुरक्षित पासवर्ड वापरणे

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर चा वापर करणे.

टू- वे अथेंटीकेशन चा वापर करणे

फायरवॉलछा वापर करणे.

रेग्यूलर अपडेट इंस्टॉल करणे

डोमेन नेम सर्व्हर (DNS) सुरक्षित करणे.

सायबर सुरक्षा म्हणजे काय? | Cyber Security 

संगणक, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली,सर्व्हर नेटवर्क आणि डेटा यासारख्या इंटरनेट शी जोडलेल्या सिस्टम्सचे डिजिटल हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे तंत्र म्हणजे सायबर सुरक्षा होय.


सायबर सुरक्षा का महत्वाची आहे?

आपल्या गोपनीय माहितीचे संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे.


सायबर सुरक्षेचे प्रकार | Types of Cyber Security 

ऍप्लिकेशन सुरक्षा, क्लाउड सुरक्षा,मोबाईल सुरक्षा,ओळख व्यवस्थापन व डेटा सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा,माहिती सुरक्षा.


निष्कर्ष

मला अशा आहे की आता तुम्हाला सायबर सुरक्षा म्हणजे काय असते( Cyber Security in Marathi) याबाबत ची माहिती आवडली असेल.


जर तुम्हाला सायबर सुरक्षा म्हणजे काय?( Cyber Security in Marathi) बद्दलचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, फॅमिली मध्ये शेअर जरूर करा.



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ